प्लॉट घेण्यासाठी 50 लाख न आणल्याने विवाहितेचा छळ

Harassment of married woman in Bhusawla: Crime against four including husband भुसावळ :  प्लॉट घेण्यासाठी माहेरून 50 लाख रुपये न आणल्याने शहरातील माहेर व पूर्व दिल्लीतील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्लॉटसाठी केली 50 लाखांची मागणी
तक्रारदार गुल्सी उत्सवसिंग च्छच्छी (27, कृष्णनगर, पूर्व दिल्ली, ह.मु.इंद्रप्रस्थ नगर, भुसावळ) या विवाहितेने माहेरून प्लॉट घेण्यासाठी 50 लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्या चौघांनी गांजपाठ करीत मारहाण केली. 4 एप्रिल 2021 ते 28 मार्च 2022 दरम्यान घडलेल्या या प्रकरानंतर पीडीता माहेरी आल्या व त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर बुधवारी रात्री पती उत्सवसिंग रवींद्रसिंग च्छच्छी, सासरे रवींद्रसिंग च्छच्छी, सासू बलजित कौर रवींद्रसिंग च्छच्छी, दीर उल्लारसिंग रवींद्रसिंग च्छच्छी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.