विद्यार्थिनीच्या हातून शिबिर उद्घाटनाने स्त्री शक्तीला मिळाले बळ -नर्गीस पिंजारी
यावल- सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित भुसावळ येथील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचा डोंगरकठोरा येथे एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात शुक्रवार, 28 रोजी गावातील अल्पसंख्याक समुदायाची जिल्हा परीषद शाळेची विद्यार्थिनी नर्गीस पिंजारी हिच्या हस्ते उद्घाटनाने शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा होत्या.
विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य -नर्गीस पिंजारी
उद्धघाटनाचा मान देवुन बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमात जनजागृती करण्यासाठी शिबिरात उद्घाटन एका विद्यार्थिनीच्या हस्ते करून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य शिबिरातून होत असल्याची नर्गीस पिंजारी हिने सांगितले. ती म्हणाली की, मुलगी ही आपल्या कुटुंबावर भार नसून मुलींना जर संधी मिळाली तर त्या संधीत स्वतःला सिद्ध करू शकतात. प्रसंगी डॉ.संदीप जैन, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष नहाटा उोंगरकठोरा सरपंच सुमन वाघ, उपसरपंच नितीन भिरूड आदींची उपस्थिती होती.
स्वच्छता ही देश सेवाच -डॉ.जैन
अभियान सुद्धा देशसेवा करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे आपण आपला परीसर स्वच्छ ठेवून आपले आरोग्य सुदृढ ठेवु शकतो. त्यातुनचं समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत मिळते. तेव्हा स्वच्छतेचा मुलमंत्र देश सेवाचं आहे, असे प्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ.संदीप जैन म्हणाले. या कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख अधिकारी प्रा. माधुरी भुतडा यांनी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेेयोच्या कार्यक्रम अधिकारी माधुरी भुतडा, सहाय्यक डॉ. शुभांगी राठी, डॉ. हेमंत नारखेडे, पपीता धांडे परिश्रम घेत आहे तर शेवटी गायत्री पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिबिरातून व्यक्तीमत्व विकास -प्राचार्य
राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थिनींनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यास मोठी मदत मिळते तसेच शिबिरातून मिळालेले अनुभव आयुष्यात उपयोगी पडतात. शिबिरातून प्रत्येेकानेे समाजकार्य करण्याचा बोध घेवून समाजात जावे व त्यातुन समाजकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांनी केले.