चाळीसगाव : प.पु. जनार्दन स्वामी यांचा भक्तपरिवार संपुर्ण महाराष्ट्रात आहे. मात्र, राजकारणाची शुद्धीकरण करण्यासाठी महामंडलेश्वर 1008 प. पु. शांतिगिरीजी महाराज यांनी औरंगाबाद, जळगाव, नाशिक, धुळे, जालना, लातुर, नगर, अमरावती, पुणे या जिल्हात चळवळ राबविली आहे. मतदानासाठी पैसे घेणे हे चुकीची प्रवृत्ती आहे,प्रत्येक नागरीकाने मतदान केलेच पाहिजे व चारित्रवान, कर्तव्यदक्ष, कतृत्ववान उमेदरावालाच मतदान केले पाहिजे, असे आवाहन करीत प.पू.शांतिगिरीजी महाराज यांनीच जळगाव मतदार संघात निवडणुक लढवावी अशी मागणी चाळीसगाव येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर जाधव, डामरूणचे सरपंच अभिमन्यु शास्त्री, संजय कापसे, प्रशांत कुमावत यांच्यासह भक्तपरिवार सदस्य उपस्थित होते. विठ्ठल महाराज पुढे म्हणाले की, राजकारणामध्ये वंशपरंपरा गुन्हेगारी, भ्रष्ट, कर्तव्यदक्ष देशभक्त अशा सर्वांचा भरणा झाला आहे. मात्र, जनतेने कर्तव्यनिष्ठ देशभक्त व्यक्तीलाच मतदान करावे याकरीता शांतिगिरीजी महाराज यांनी लबाड, लाचार व भांडवलदार राजकारणांच्या पासुन लोकशाही वाचविण्याकरीता शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. निष्काम कर्मयोगी असलेले शातिगिरी महाराज यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढवावी या विधानसभा मतदार संघात लाखो भक्तपरिवार असल्याने आगामी काळात भक्तपरिवाराने लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणुक लढवावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. संतमहात्मा यांचा कल भाजपाकडे असल्याने आम्ही आधी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही आहोत. मात्र, अपक्ष देखील निवडणुक लढण्याचा निश्चय केल्याचा निर्धार यावेळी भक्तपरिवाराने केला आहे.
चाळीसगावात एक लाख शिष्य
लोकसभा निवडणुकी बरोबर चाळीसगाव विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जय बाबाजी भक्त परिवाराने केली आहे. यासाठी तालुक्यातील एक लाख शिष्य कामाला लागले आहे. उमेदवारांची नावे योग्य त्यावेळी सर्वांशी चर्चा करून घोषित केली जातील अशी माहिती सरपंच अभिमन्यू शास्त्री यांनी दिली. याप्रसंगी अमरसिंग पाटील, नारायण कुमावत, आप्पा बोरसे, संजय पाटील, अजय पाटील, नाना ठाकरे, बाबा देशमुख, रमेश आघाडे, बद्रीनाथ पाटील, अरुण बोरसे, विश्वंभर सीसोदे, ललित निभोरकर, रवी पाटील हे उपस्थित होते.