फटाके फोडून, राज्यातील शेतकरी नेत्यांचे आभार

0

नवापूर। महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध संघटनांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी सुरु केलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्या बद्दल नवापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी फटाके फोडून राज्यातील शेतकरी संघटनेच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.महाराष्ट्र राज्यात गेल्या अधिवेशनापासून शेतकर्‍यांच्या विविध संघटनांनी तसेच विविध पक्षांनी शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी आंदोलन सुरु केले होते.

शेतकर्‍यांच्या सर्व संघटना एकत्र आल्याने आंदोलन यशस्वी
काही पक्षानी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली.तर काही पक्ष शेतकर्‍यांबरोबर रस्त्यावर उतरले तसेच पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी 1 जून पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाला संपूर्ण राज्यातून शेतकर्‍यांनी पाठींबा देत या आंदोलनाला अधिक तीव्र करण्यासाठी शेतकर्‍यांच्या सर्व संघटना एकत्र येवून तीव्र आंदोलन करीत महाराष्ट्र सरकारला कर्ज माफिचा निर्णय घेण्यास भाग पाडले, असे मत माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित यांनी व्यक्त केले. यावेळी दिलीप गावित, भानुदास गावित, आर सी गावित,जालमसिंग गावित, ईश्वर गावित, रोबेन नाईक, नवलसिंग गावित,राजू गावित, राजाराम गावित, प्रेमाजित कोकणी, अनिल गावित ,वेच्या गावित, दिलीप कोकणी, हामू गावित, इसू गावित, शंकर गावित, जयनु गावित, वाड्या कोकणी, दिलीप गावित, वसा गावित, दासू गावित, प्रभू वळवी, रविकांत गावित, कुंवरसिंग गावित, धरमसिंग गावित, परेश गावित, सुभाष गावित ,केसार्‍या गावित, अर्जुन गावित, आलू गावित, बाबू गावित, दत्तू गावित, दिलीप एस गावित ,गुलाब गावित आदी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.