फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट

0

जळगाव । शिरसोली रस्त्यावरील शामा फायर वर्क या फटाका निर्मिती कारखान्या मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यातच कंपनीच्या मालकांना देखील किरकोळ मार लागला आहे. कपंनीतील कामागार फटाक्यांचा दारु मसाला कालवणीचे काम करतांना हा स्फोट होवुन बारा बाय बाराच्या खोलीसह बाहेरील विसबाय विसच्या चारही बाजुच्या भिंतीच्या विटा अक्षरश: दोनशे मिटर दुरवर फेकल्या गेल्या जावून परिसरात विटांचा खच पडलेला होता. शेजारच्या तीनचार गावांसह जळगाव शहरात स्फोटाचा आवाज ऐकावयास आला. 43 अशं प्रचंड तापमानामुळे हा स्फोट घडल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

स्फोटक मिश्रणाने केला घात
शिरसोली रस्त्यावर विशन शामलाल मिलवाणी यांच्या मालकीचे शामा फायर वर्क’ हा फटाका निर्मीतीचा कारखाना आहे. शिरसोली गावापासुन चार-पाच किलोमिटर अंतरावर बोरनार शिवारातील माळरान व ओजाड टेकड्यांना लागून असलेल्या या फटाका कारखान्यात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. गेल्या दहा-बारा वर्षापासुन कार्यरत राजेंद्र ऊर्फ राजु बाबुराव तायडे व हेमंत प्रेमलाल जैयस्वाल दोघेही फटाक्यासाठी लागणार्‍या दारु-मसाला’ कालवणीचे काम करीत असतांना झालेल्या या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यु झाला.

अन् मालक बचावले
शामा फायरचे मालक विशन शामलाल मिलवाणी हे नेहमी कारखान्याची पाहणी करतात. मंगळवारी देखील साडेतीन वाजता स्फोट होण्यापुर्वीच नेहमी प्रमाणे पहाणी करण्यासाठी जात असतांनाच स्फोट होवुन उभ्या भिंतीच्या विटा दुरवर फेकल्या गेल्याने मिलवाणी यांच्या पायावर तुटलेल्या भिंतीचा तूकडा पडला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. काही वेळानंतर ही घटना घडली असता कदाचीत ते, या खोलीच्याच अगदी जवळ आल्यावर त्याच्याही जिवाचे बरेवाईट होण्याची शक्यता होती.

उष्णतेमुळे अपघाताची शक्यता
प्रचंड उष्ण तापमाना मुळे ऐरवी आम्ही दुपारी काम बंदच ठेवतो..आजही बंद करतांनाच हि दर्घटना घडली. गेली तीन दिवस सुट्यांचा काळ असल्याने काम बंद होते. मृत्युमूखी पडलेले दोन्ही कामगार काम संपवुन लगेच बाहरे पडणार इतक्यात स्फोट घटला..सेकंदापुर्वीच दोघे बाहेर पडले असते तर जिव वाचला असता आणि सेकंदानंतर स्फोट झाला असंता तर यात जखमी महिलेसह मृत्यूची संख्या वाटली असती असाही अंदाच कंपनी मालक सुनील मिलवाणी यांनी व्यक्त केला.

‘ ती’ खोलीच नामशेष
स्फोटामुळे खोलीची डबलभींतीच्या विटा-रेती चारही बाजुला दोनशे मिटर दुरवर फेकले गेले. यात खोली शेजारुन जाणारी महिला कामगार गिताबाई कैन्हय्या मोची (वय-38,रा. ईच्छादेवी मंदिरा जवळ) या गंभीर जखमी झाल्या, जखमी महिलेस तातडीने जिल्हा रुग्णालयात उपाचारार्थ हलवण्यात आले असुन दोघा मयत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, सचिन बागुल, एन.बी.सुर्यंवशी, रोहन खंडागळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळकडे धाव घेतली.डीवायएसपी सचिन सांगळे थोड्यावेळातच कारखान्यात पोचले. यातच मयतांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी करत एकच आक्रोश केला होता.