मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. फडणवीस यांच्यावर सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ट्वीटरवर फडणवीस “पूर्व मुख्यमंत्री” ट्रेंडवर असून देशभरातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहे. गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या “असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,” असे अमित शहा यांनी ट्वीट केले आहे.
Warm birthday greetings to Shri @Dev_Fadnavis, the former Chief Minister of Maharashtra. May you continue to serve the people of Maharashtra with same passion and dedication. I pray to almighty for your good health and a long life.
— Amit Shah (@AmitShah) July 22, 2020
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना???????? pic.twitter.com/bmxOphnXea
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 22, 2020
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा..????@Dev_Fadnavis pic.twitter.com/cb1obycPAI— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 22, 2020
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2020