फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे- सुप्रिया सुळे

0

मुंबई : शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांनी सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. एक प्रकारे धर्मा पाटील यांची ही हत्याच केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे.

धुळे जिल्ह्यातील वृध्द शेतकरी धर्मा पाटील यांची शेतजमीन सरकारने उर्जा प्रकल्पासाठी ताब्यात घेतलीहोती मात्र, या जमीनीला सरकारी भावाने मोबदला देण्यात आला. या अन्यायाविरोधात धर्मा पाटील हे गेली दोन वर्ष लढा देत होते. गेल्याच आठवड्यात त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जे.जे रूग्णालयात ठेवण्यात आले होते. काल रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.