इंदापूर । कळंब येथील प्रा. शैला दत्तात्रय फडतरे यांना राजस्थान येथील जेजेटी विश्वविद्यालयाकडून व्यवस्थापनशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. एमबीए कॉलेजच्या फडतरे यांनी सन 2014 मध्ये जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथे विद्यावाचस्पती (पीएचडी) साठी नोंदणी केली होती. 1 जुलै 2017 रोजी त्यांचे संशोधन पूर्ण झाले व त्यांना जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान यांची विद्यावाचस्पती ही पदवी पदवी प्रदान करण्यात आली. शैला फडतरे यांनी व्यवस्थापनशास्त्र या विभागाअंतर्गत अ स्टडी ऑन इम्पॅक्ट ऑफ मन रिसोर्स प्रॅक्टीसेस ऑन मोटीव्हेशन ऑफ एम्प्लॉईज इन मिडियम स्केल मॅन्युफॅक्च रींग इंडस्ट्रीस दन पुणे डिस्ट्रीक्ट या विषयावर संशोधन केले. या संशोधनादरम्यान त्यांना प्रा. डॉ. मधु गुप्ता, डॉ. पी. के. सिन्हा, प्रा. श्रीराम बडवे यांचे मार्गदर्शन लाभले.