फत्तेपूर ग्रां.प.ने केलेले दलीत वस्तीचे काम योग्यच

0

जामनेर पंचायत समितीने दिला स्वयंस्पष्ट अहवाल
जामनेर-फत्तेपूर गृप ग्रामपंचायतीने केलेले दलीत वस्ती सुधार योजनेतील काम योग्यच असून त्यात कुठलीही अनियमीतता किंवा अपहार केलेला नाही, असा स्वयंस्पष्ट अहवाल चौकशीअंती जामनेर पंचायत समितीने दिला असून गणेश ईधाटे यांची तक्रार निकाली काढली आहे.
तक्रारीनुसार विस्तार अधिकारी देवचंद लोखंडे यांनी तक्रारदार गणेश ईधाटे यांना सोबत घेऊन चौकशी केली.

सरपंचांनी दिली माहिती
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे सन 2017-18 या आर्थीक वर्षात फत्तेपूर ग्रामपंचायतीला दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत तीन लाख रूपये निधी मंजूर केला होता. या निधीच्या वियोगासाठी ग्रामपंचायतीने 2 ऑक्टोबर 2017 च्या ग्रामसभेत विषय घेऊन गृप ग्रामपंचाती अंतर्गत येणार्‍या टाकळी गावात रस्ता काँक्रेटी करणाच्या विषयास मंजूरी घेतली होती. ग्रामसभेच्या मंजूरीनुसार काम करण्यात येऊन 2 लाख 25 हजार रूपये मंजूरी रस्ता बांधकाम करणार्‍यास अदा करण्यात आली आहे. दलीत वस्तीसाठी मंजूर झालेले काम अन्य वस्तीत करून फत्तेपूर ग्रामपंचायतीने या रकमेचा अपहार केल्याची तक्रार फत्तेपूर येथील रहिवासी गणेश गजमल ईधाटे यांनी जामनेर पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी देवचंद लोखंडे यांनी तक्रारदार गणेश ईधाटे यांना सोबत घेऊन चौकशी केली. दलीत वस्तीत आधीच कामे झालेली होती. मात्र वाढीव गावठाणातील दलीत वस्तीत रस्त्याची कामे झालेली नसल्याने ग्रामपंचायतीने वाढीव वस्तीतील दलीत वस्तीत रस्ता काँक्रेटीकरणाचे काम केले आहे. असे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यामुळे हे काम नियमबाह्य नसून त्यात कुठलाही अपहार झालेला नाही. असा अहवाल गटविकास अधिकारी अतुल जोशी यांच्या स्वाक्षरीने देत ईधाटे यांचा अर्ज निकाली काढला आहे. अशी माहिती सरपंच रत्नाबाई शंकर पाटील यांनी दिली.