फत्तेपूर (फॉ) येथे लाखोंचा कोरडा गांजा जप्त

0

शिरपूर: तालुक्यातील फत्तेपूर (फॉ) ग्रामपंचायत अंतर्गत साकऱ्या पाडा येथे लाखो रुपयांचा सुका गांजा पकडल्याची कारवाई शनिवारी, ६ मे रोजी दुपारी शिरपूर पोलिसांनी केली.

तालुक्यातील फत्तेपूर (फॉ) येथे सांगवी पोलिसांनी कारवाई करून लाखो रुपयांचा सुका गांजा पकडला आहे. एका गोपनिय माहितीवरून सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाने फत्तेपूर (फॉ) येथील सकऱ्यापाडा येथे एका घरावर धडक कारवाई केली. कारवाईत लाखो रुपये किमतीचा अदमासे दोन क्विंटल सुका गांजा पकडला असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.