भुसावळ- बंगालच्या उपसागरातील फनी चक्रीवादळ शुक्रवारी दुपारी धडकून दुपारनंतर ओडिशा किनार्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभुमीवर रेल्वेने पुरी, ओडीशा आदी भागातून धावणार्या सात रेल्वे गाड्या शुक्रवार आणि रविवारी रद्द केल्या आहेत. गाडी क्रमांक 12843 अप पूरी अहमदाबाद एक्सप्रेस शुक्रवारी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 12844 डाऊन अहमदाबाद पुरी एक्सप्रेस 5 मे रोजी रद्द राहणार असून गाडी क्रमांक 18408 डाऊन साईनगर शिर्डी पुरी एक्सप्रेस 5 मे रोजी शिर्डी स्थानकावरुन रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 18407 अप पुरी साईनगर शिर्डी गाडी पुरी स्थानकावरून 3 मे रोजी रद्द करण्यात आली तर गाडी क्रमांक 22974 अप पूरी गांधीधाम एक्सप्रेस पुरी स्थानकावरून शनिवार, 4 मे रोजी रद्द करण्यात आली. 18422 अप पुरी-अजमेर एक्सप्रेस गुरुवार, 2 मे रोजी रद्द करण्यात आली होती. गाडी क्रमांक 18421 डाऊन अजमेर पूरी एक्सप्रेस 7 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. रद्द झालेल्या सर्व एक्सप्रेस गाड्या भुसावळ रेल्वेच्या विभागातून जात असल्याने रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घेवून गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.