चाळीसगाव। गेल्या 2 वर्षा पासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेले 2 आरोपींना चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकार्याच्या आरोपी शोध पथकाने 2 जून 2017 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास तालुक्यातील रांजणगाव येथून मोठ्या शिताफीने अटक करून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
तालुक्यातील रांजणगाव येथील आरोपींवर सन 2015 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 47/2015 प्रमाणे भादंवि कलम 326, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी उमेश शांताराम पाटील (22), सतीश पांडुरंग गायकवाड (24) व राजेंद्र अशोक देवरे (34) तिघे राहणार रांजणगाव ता चाळीसगाव हे पोलिसांकडे अटक न होता फरार होते. तेव्हा पासून पोलीस त्यांच्या मागावर होती. तिघे आरोपी रांजणगाव येथे आले असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आरोपी शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र रसेडे, पोलीस नाईक योगेश मांडोळे, अरुण पाटील, भडगाव पो.स्टे. चे पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांना मिळाल्यावरून त्यांनी 1 जून 2017 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास रांजणगाव गावी आरोपींच्या घराजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले आहे. तिघा आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.