फरार आरोपीला पोलिसांनी पकडले

0

जळगाव – बनावट धनादेश देवून प्लॉट खरेदी करून जागा मालकाची फसवणूक केल्याची प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात भगवान नारायदास पारखे यांच्या फार्यादीवरून गुन्हा दाखल होता. याप्रकरणी संशयीत आरोपी सोबत या प्रकरणात खरेदी व्यवहारातील साक्षिदार मुकेश चौधरी रा. नशिराबाद हा फरार होता. गुप्त माहितीवरू सह्यायक पोलिस निरीक्षक रोहीदास ठोंबरे यांच्या पथकातील किरण पाटील, अतुल पवार, दिलीप चिंचोले यांनी मुकेश चौधरीला नशिराबादवरून अटक केली.