फलक मराठीत लावा, अन्यथा मनसे आंदोलन

0

पिंपरी : कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची पिंपरी-चिंचवडमधील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये येत्या पंधरा दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. तसेच शहरातील सर्व हॉटेल व दुकानांवर मराठी फलक न लागल्यास आंदोलन करण्याचा इशाराही चिखले यांनी दिला. याबाबत पत्रकार परिषद घेऊन चिखले यांनी हा इशारा दिला. यावेळी राजू सावळे, अंकुश तापकीर, हेमंत डांगे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.