फलटणच्या त्या ऊसतोड कामगारांची निंभोरी तांडा येथे आरोग्य तपासणी

0

पाचोरा : पाचोरा, जामनेर अन् भुसावळ तालुक्यातील सुमारे ३५० ऊसतोड कामगार फलटन (सातारा) येथे तालुक्यातील राजूरी गावात गेल्या १५ दिवसा पासून लॉकडाऊन मधे अडकले होते. त्यांच्याकडील अन्नधान्य व किरणा संपल्याने उपासमारीची वेळ येवून ठाकली होती, दरम्यान हा प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून त्यांना तात्काळ मदत करण्याचे आवाहन केले. श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाचे संचालक मंडळ व कारखान्याचे कर्तव्यदक्ष संचालक मारोती रामचंद्र सांगळे यांनी ऊसतोड कामगारांना मुबलक धान्य, किराणा व गुरांसाठी चारा उपलब्ध करून दिला होता. ऐवढ्यावरच न थांबता मारोती सांगळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांच्याशी चर्चा करून ना, अजित पवार यांनी तातडीने राज्याचे साखर आयुक्त सुब्बाराव व सातारा येथील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश देवून ऊसतोड कामगारांना कारखान्याच्या खर्चाने त्यांचे गावी पोहचविण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. दरम्यान ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी फलटन येथील तालुका आरोग्य विभागाकडून दिनांक १९ रोजी करुन कामगारांना दिनांक २० रोजी राजूरी येथून घरी सोडण्याची व्यवस्था केल्यानंतर कामगार मंगळवारी सकाळी बारा वाजता स्वगृही पोहचले यात पाचोरा तालुक्यातील निंभोरी व सातगाव डोंगरी तांडा येथील ६० कामगार निंभोरी तांडा येथे आल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांचे मार्गदर्शनाखाली मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यांनी केली आरोग्य तपासणी

निंभोरी तांडा येथील श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याचे मुकादम गोकुळ राठोड व रामसिंग राठोड यांच्या ६० ऊसतोड मजुरांची तपासणी डॉ चंद्रशेखर पाटील, डॉ मयूर पाटील, आरोग्य सेवक ए आर धूरधरे,आर व्ही भिवसने, सेविका पी के तायडे, आशा स्वयंम सेविका,कल्पना खासेराव, सुशमा चव्हाण, अंगणवाडी सेविका मिना खासेराव, मिना चंदणे, ज्योती चंदणे, यांनी आरोग्य तपासणी केली,त्यांना विनायक दिवटे, सरपंच बाळकृष्ण धुमाळ, पोलीस पाटील,संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, कैलास खासेराव यांनी सहकार्य केले.

दोन आठवडे काळजी घ्या -डॉ चंद्रशेखर पाटील

सर्व ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली असली तरी मजुरांनी पुढील दोन आठवडे घरातच रहा, ताप,सर्दी, खोकला,खांशी, डोकेदुखी या सारखे आजाराची लक्षणे आढळून आल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून उपचार करून घ्या, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा,बाहेर निघतांना तोंडावर रुमाल अथवा मास बांधा, सोशल डिस्टन्स पाळा,अशा सुचना देवून येथील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंम सेविकांनी दररोज ऊसतोड कामगारांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना हि डॉ चंद्रशेखर पाटील यांनी दिल्या.