भुसावळ- फसवणूक प्रकरणी मलकापूर पोलिसात संशयीत आरोपी राम अवतार गौरीशंकर परदेशी (रा.शनीमंदिर, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. संशयीत आरोपी भुसावळातील आठवडे बाजारात आल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेत मलकापूर पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांचा मार्गदर्शनखाली एएसआय तस्लिम पठाण, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, परदेशी आदींनी केली.