फसवणूक प्रकरणी एकास पाच दिवसांची पोलीस कोठडी

0

निंभोरी । मध्यप्रदेश सेंदवा येथील जिंनीग मालकास सुमारे 75 लाखाला चुना लाऊन पाचोरा येथील कपाशी व्यापार्‍याला फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात पाचोरा पोलिसांनी त्याला सेंदवा येथून त्यांच्या राहत्या घरुण अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अजय रामेश्‍वर अग्रवाल हे मुख्य संशयिताचे नाव आहे. तालुक्यातील सार्वे-पिंप्री येथील कपाशीचे व्यापारी सुभाष पाटील यांनी यांनी सन 2013 व14 मध्ये पासडी(ता भडगाव)येथील आशिर्वाद जिनिंगचे मालक अजय रामेश्‍वर अग्रवाल यांना रोखीने तर काही उधार कपाशी शेतकर्‍यांचा कापूस मोजून दिला अग्रवाल याने पाटील यांचा विस्वास संपादन करुन शेवटी सुमारे पऊन कोटी रुपयांला चुना लाऊन पसार झाला. पैसे आज देतो उद्या देतो करून पुढील तारखेचे धनादेश दिले ते बँकेत वटले नाही हे पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेवून पाचोरा पोलीस ठाण्यात मुख्य संशयित अजय अग्रवालसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.