फसवणूक प्रकरणी तिघा आरोपींना कोठडी

0

भुसावळ । शहरातील विठ्ठल-रुखमाई पतसंस्थेतून कर्ज घेवूनही तिची परतफेड न करणार्‍या कर्जदार मनीष रमेश नागराणी (39) व मनीष प्रल्हाद नागराणी (40) तसेच जामीनदार सुनील प्रल्हाद नागराणी यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवार 18 रोजी अटक केली होती.

संशयीत आरोपींना शनिवार, 19 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पतसंस्थेच्या 184 कर्जदारांनी सुमारे 11 कोटींचे कर्ज बुडवल्याने त्यांच्याविरुध्द बाजारपेठ पोलिसात लेखा परीक्षक राजेश कलंत्री यांनी फिर्याद दिल्यावरुन यापुर्वी 2016 मध्ये गुन्हा दाखल होता. शुक्रवारी संशयीतांना अटक करण्यात आली होती. तपास निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.