‘फादर्स डे’च्या दिवशी मुलाबरोबर फायनल; सेहवागचे ट्वीट

0

नवी दिल्ली । रविवारी 18 जून रोजी भारत व पाक या चिर-प्रतिद्वंद्वी संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. सोशल मीडियावर या सामन्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चां सुरू आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्वीट केले आहे की, नातवाने चांगला प्रयत्न केला (अच्छा ट्राय किया पोते). सेमीफायनलमध्ये पोहोचणे मोठे यश आहे. ही तर घरातीलच गोष्ट आहे. पण आता फादर्स डे दिवशी मुलाबरोबर फायनल आहे.

या गंमतीला गंभीरपणे घेऊ नको मुला. विरेंद्र सेहवागच्या या ट्वीटवर काही लोकांनी त्यांना अपशब्द म्हटले तर काहींनी सल्ला दिला की, वरिष्ठ क्रिकेटपटू असूनही अशाप्रक्रारचे काँमेट सेहवागने करायला नको पाहिजे होते. या सामन्याबद्दल महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ट्वीट केले आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये टीम इंडियाचे अभिनंदन केले असून भारताला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीने म्हटले आहे की, भारताने उत्कृष्ठ खेळ केला.