फारुक शेख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0

जळगाव । राज्य शासनाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार शहरातील क्रीडा मार्गदर्शक फारुक शेख यांना घोषित करण्यात आला होता. परंतु, तिसर्‍याच दिवशी हा पुरस्काराला स्थगिती देवून खात्री करुन हा पुरस्कार देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, 54 दिवसापर्यंत खात्री न केल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक फारुक शेख यांच्यातर्फे मंगळवार, 10 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना देण्यात आले.

विविध संघटनांचा पाठींबा
माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक रमेश जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, अंजली पाटील, कांचन चौधरी, एमआयएमचे अध्यक्ष रय्यान जहागिरदार, इकराचे अ. करीम सालार, मनसेचे जमील देशपांडे, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, ओबीसी सेलच्या सविता बोरसे नगरसेवक जितेंद्र मुंदडा, महावीर बँकेचे दलिचंद ओसवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फारुक शेख यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला. 26 क्रीडा व 38 सामाजिक संघटनांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.