जळगाव। जिल्ह्यातील सर्व फार्मासिस्ट बांधवांना आपल्या महाराष्ट्र स्टेट फार्मसी कॉन्सीलसंबंधी कामासाठी मुंबई येथे जाणे शक्य होत नसल्याने डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर्स असोसिएशन केमिस्ट भवन, जळगाव येथे फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सचिव अमोल झंवर, ब्रजेश जैन, संजय तिवारी, ईरफान सालार तसेच फार्मसी कौन्सीलचे गावडे आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये नवीन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दुय्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नावात बदल, नवीन फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाईल, दुय्यम पीपीपी, पुननोंदणी अतिरिक्त शैक्षणिक अर्हता नोंद कामकाज करण्यात आले. शिबिरात सुमारे 1200 विद्यार्थी व फार्मासिस्टचे नवीन नोंदणी व नुतनीकरण करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी राजीव चौधरी, अनिल कोळंबे, साहेबराव भोई, बाळकृष्ण सोनवणे, खालीद शेख, रविंद्र रडे, परीमल आदींनी सहकार्य केले.