पिंपरी चिंचवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयांमध्ये शनिवार दि. 18 जानेवारी रोजी फीट इंडिया-वॉकेथोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम करावा, खेळांमध्ये भाग घ्यावा, प्रकृतीस्वास्थ्य राखावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. फिट इंडिया वॉकेथोन कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागातील 860 विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि सेवकांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना शारिरीक तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन…
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गेट पासून म्हाळसाकांत चौक – लोकमान्य हॉस्पिटल – भेळ चौक – संभाजी चौक मार्गे (3.5 किमी)चालत महाविद्यालयात प्रवेश केला. तसेच महाविद्यालयातील क्रीडांगणावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती बाबत मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास लाड, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चिमटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ. पोपट तांबडे, प्रबंधक श्री. अनिल शिंदे आदी उपस्थित होते. तर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मधुकर राठोड, प्रा. कृष्णा शिंदे, प्रा. पुनम आवटे, प्रा. नम्रता अल्लाट व शिक्षकेतर कर्मचारी श्री. अशोक परंडवाल आणि फिरोज खान व अक्षय सुरवसे या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.