फिरत्या तारांगणात अवकाश यात्रेची अनुभूती

0

जळगाव प्रतिनिधी । मराठी विज्ञान परिषद आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे हरिजन कन्या छात्रालयात अवकाश सफरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यासाठी एक मोठा बलून फुगवुन त्याच्या छतावर गोल घुमट तयार करण्यात आले होते. यात थ्रीडी तारांगणाचा फिल्म शो दाखवला. यात ब्रम्हांड निर्मितीपासून आकाशगंगा, तार्‍यांचा समूह, ग्रहांचा समूह, धूमकेतू आणि सौर मंडळाची आधुनिक पद्धतीने तयार केलेली वैज्ञानिक विश्‍वसैर विद्यार्थिनींना घडवून आणली. हे फिरते तारांगण जळगाव शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये दाखवण्यात येत आहे. याप्रसंगी भास्कर काळे (सांगली) यांनी विद्यार्थिनींना वेगवेगळे प्रयोग दाखवून त्यांच्या शंकाचे निरसन केले. यशस्वीतेसाठी अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे, कार्यकारिणी सदस्य शशिकांत नेहेते, शंभू पाटील, आर. ए. पाटील, प्रा. आर. बी. देशमुख यांनी सहकार्य केले.