मुंबई। फिलिप्स हेल्थकेअरने झोपेच्या तक्रारीसंधर्बात जनजागृती करण्यासाठी अभिनेता राम कपूर आणि गौतमी कपूर या जोडीला ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमल्याची घोषणा केली आहे. झोपेत श्वसनाचा त्रास होणे यासारख्या झोपेशी संधर्बात आजारांबद्दल भारतात प्रथमच कोणी कलाकार जनजागृती करण्यासाठी पुढे आले आहेत. सध्या भारतात 91 दशलक्षापेक्षा अधिक लोकांना झोपेत श्वसनाचा त्रास होतो. मात्र यातील गंभीर बाब म्हणजे बहुतांश लोकांना आपल्याला त्रास होतो याची जाणीव नसते. नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ सल्लागार न्यूरॉलॉजी आणि स्लिप मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. मनवीर भाटिया तसेच फिलिप्स इंडियाच्या एकत्र सहभागातून या क्षेत्रात बरेच काम सुरु आहे.
राम आणि गौतमी कपूर यांनी देखील या जनजागृतीच्या निमित्ताने स्वतःला या कामात जोडून घेतले आहे. फिलीप्सने देशभरात 500 हुन अधिक स्लिप ल्याबस सुरु केल्या आहेत. यातील सुमारे 70 ल्याबस महाराष्ट्रात आहेत. आरोग्यदायी जीवनपद्धती आणि आयुष्याचा दर्जा वाढविण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यास बांधील असलेल्या या कंपनीने भारतात 400 हुन अधिक स्लिप तंत्रज्ञाना प्रशिक्षण दिले आहे.