फुकटे प्रवासी रेल्वेच्या रडारवर ; पहिल्याच दिवशी एक लाख 36 हजारांचा दंड वसुल

0

भुसावळ- विनातिकीट प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने विशेष मोहिम उघडली असून पहिल्याच दिवशी 2 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकासह विविध गाड्यांमध्ये तपासणी केल्यानंतर तब्बल 286 केसेसच्या माध्यमातून एक लाख 36 हजार 685 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली.

मोहिमेने प्रवाशांमध्ये उडाली खळबळ
38 तिकीट निरीक्षकांसह 16 रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसा सोबत घेत मंगळवारी एकाचवेळी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्‍या 137 प्रवाशांकडून 65 हजार 205 रुपयांचा दंड तसेच रीझर्व्ह डब्यातून साध्या तिकीटावर प्रवास करणार्‍या 146 प्रवाशांकडून 70 हजार 730 रुपयांचा दंड तसेच सामानाचे बुकींग न करता वाहतूक केल्याच्या तीन केसेसच्या माध्यमातून 750 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. विशेष मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे एन.पी.पवार, व्ही.के.भंगाळे, वाय.डी.पाठक, हेमंत सावकारे, आर.पी.सरोदे, एल.आर.स्वामी, ए.के.गुप्ता, ए.एम.खान, अनिल खर्चे, अजय बच्छाव, निलेश पवार, ए.एस.राजपूत, निलेश पवार, पुष्पा पांडे, बी.एस.महाजन व सर्व तिकीट कर्मचारी सहभागी झाले.