फुगेवाडी-दापोडीत वारकर्‍यांना केले अन्नदान

0

खडकी- श्री क्षेत्र देहु येथुन पंढरपुरकडे प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महारांजांच्या पालखीचे शनिवारी फुगेवाडी-दापोडी भागात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. वारकर्‍यांकरिता आरोग्य तपासणीसह विविध वस्तुंचे वाटप व अन्नदान करण्यात आले. फुगेवाडी शिवसेना शाखेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही पालखीतील दिंडी क्रमांक 8 मधील वारकर्‍यांना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते अन्नदानाचे वाटप करण्यात आले. या वेळी उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शाखा प्रमुख निलेश हाके, शैलेश हाके, चिंचाप्पा लिंबोळे, सदानंद जगताप, अ‍ॅड. बाजीराव दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार परदेशी, सुनिल कदम, संदिप दळवी, रामदास बांडे, सुनिल साठे, मृणाल हाके, वर्षा सांबेळ, गंगा पोळके आदींनी सहभाग घेतला. आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते या वेळी दिंडी प्रमुख तुकाराम सलगर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मागील चार वर्षांपासुन शिवसेना फुगेवाडी शाखेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्ष दापोडीच्यावतीने डॉ. जयश्री शेलार, डॉ. वर्षा वसावे, डॉ. प्रिती थोरात, डॉ. मुने यांच्या नेत्रुत्वाखाली वारकर्‍यांची मधुमेह तपासणी करण्यात आली. युवा कार्यकर्ते शेखर काटे, राहुल काटे, दीपक काटे, प्रमोद गायकवाड, कुणाल सोनीग्रा यांचे सहकार्य लाभले.

जैन संघटनेतर्फे चहा वाटप
चिंचवड ः जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त कै. अनिल शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप करण्यात आले. या शिबिरात 540 वारकर्‍यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. भारतीय जैन संघटनेतर्फे चहा व बिस्किट वाटप करण्यात आले. डॉ. गौरी भोसकर, डॉ. मयुरेश भोसकर, डॉ. रोहित लांडगे, डॉ. संतोष पवार, डॉ. सुनील यादव, डॉ. प्रवीण रोकले यांनी वारकर्‍यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी जयंत कुटे, प्रवीण तुपे, अनिल गालिंदे, मिलिंद इनामदार, शरद लुणावत, संदेश गादीया, विरेश छाजेड, अतुल बोरा, संदीप कांकरीया, गजानन चिंचवडे, कैलास इंदलकर, हंबीरराव आवटे, पुरूषोत्तम डबीर, मोहन लोंढे, मल्लपा कस्तुरे, जगदीश थोरवे, प्रवीण कुदळे आदी उपस्थित होते.

वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबिर
आशा फाऊंडेशन व पोलीस मित्र संघटनेच्यावतीने माऊलींच्या वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेक वारकरी महिला व पुरूष यांनी घेतला. यावेळी कैलास कुटे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. अमोल शहाणे व डॉ. भारती शहाणे यांनी वारकर्‍यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविली. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष बाबुराव फडतरे, राहुल श्रीवास्तव, विभाग प्रमुख विनिता आंबेरकर, सीमा डेरे, प्रथमेश आंबेरकर आदी उपस्थित होते.