फुड टॅक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे वरणगाव, भुसावळात सर्वेक्षण

0

जळगाव। डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फुड टॅक्नॉलॉजी विद्यार्थ्यांतर्फे प्रोजेक्ट परिक्षेतंर्गत 24 जून ते 2 जुलै दरम्यानात वरणगाव व भुसावळ शहरातील विविध कंपनी व कारखान्यांना तसेच होलसेल विक्रेत्यांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी या आठ दिवसात विद्यार्थ्यांनी कोण-कोणत्या प्रोडक्टची खरेदी व विक्री किती प्रमाणात होते. तसेच ते कसे तयार केले जातात यावर सर्वेक्षण करण्यात आले.

विविध फुड कंपन्यांना विद्यार्थींनीनी दिल्या भेटी
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फुड टॅक्नॉलॉजी येथे शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणार्‍या व्टिंकल दुबे, विशाखा शिंदे, रोहिणी देशमुख, निकिता सैनानी या विद्यार्थींनीना प्रोजेक्ट परिक्षेतंर्गत मार्केट सर्वेचा विषय देण्यात आला होता. त्या अनुषंघाने प्रा. नरसिंग नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही विद्यार्थींनीनी सर्व प्रथम भुसावळ शहरातील वेगवेगळे फुड प्रोजक्ट तयार करणार्‍या विविध कंपनी व कारखान्यांना भेटी दिल्या. यात दिपक मसाला, पेरिना आईस्क्रीम, जयहिंद बेकरी आदी ठिकाणी विद्यार्थींनी भेटी देवून तेथे चालणार्‍या संपूर्ण कामकाची माहिती घेतली. यातच प्रत्येक प्रोडक्टची माहिती घेवून प्रोडक्ट कसे तयार केले जातात, कोणती मशिनरी वापरली जाते, दिवसातून किती प्रोडक्ट तयार केले जाते, किती विक्री होते याचे सर्वेक्षण केले. यानंतर तेथील कंपनी मालकांना कर्मचार्‍यांची भेट घेवून सुसंवाद साधला. गेल्या चार ते पाच दिवसात विद्यार्थींनीनी या ठिकाणी फिरून सर्वेक्षण केेले. यानंतर भुसावळात सर्वेक्षण केल्यानंतर व्टिंकल दुबे, विशाखा शिंदे, रोहिणी देशमुख, निकिता सैनानी या फुड टॅक्नॉलॉजीच्या विद्यार्थींनीनी वरणगावातील सर्व हॉलसेट-रिटेलर विक्रेत्यांची माहिती काढून त्यांच्या दुकानांना भेटी देवून त्या ठिकाणी सर्वात जास्त विक्री होणार्‍या प्रोडक्टची माहिती माहिती घेतली. यातच कोणत्या प्रोडक्टला सर्वात जास्त मागणी नागरिकांकडून होते हे देखील विद्यार्थींनीनी सर्वेक्षण अंतर्गत माहिती घेवून नमूद केली. खरेदी-विक्री किती होते? याबाबत माहिती घेवून सर्वेक्षण चार्टमध्ये त्यांनी नोंदी घेतल्या.सोबत विद्यार्थींनींनी दोन्ही शहरात घरो-घरी जावून रहिवाश्यांना कोणते प्रोडक्ट खरेदी करतात व कोणते प्रोडक्ट आवडीचे आहे याबाबतही माहिती जाणून घेतली.