फुलगावच्या इसमाची आत्महत्या

0

वरणगाव – फुलगाव येथील वसंत रामचंद्र चौधरी (44) या इसमाचा मृतदेह वरणगाव शहरातील शिवाजी नगरातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. या इसमाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी घर सोडले होते. वरणगावच्या शिवाजी नगरातील काटेरी झुडुपात असलेल्या विहिरीत 22 रोजी मृतदेह आढळला. वरणगाव पोलिसात महेश सुपडू सोनवणे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक निलेश वाघ व हवालदार सुनील वाणी करीत आहे.