फुलगावच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

0

भुसावळ- दीपनगर औष्णिक केंद्रात खाजगी सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामास असलेल्या 38 वर्षीय इसमाने फुलगाव शेत-शिवारातील पथ्यपूर महाराज मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला दोन बांधू आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रशांत वसंत दुसाणे (38, माजी सैनिक वसाहत, फुलगाव) असे मयताचे नाव आहे. दुसाणे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. बुधवारी सकाळी देव दर्शनास मंदिरात आलेल्या शेतकर्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वरणगाव पोलिसांना माहिती कळवण्यात आली. मयताच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परीवार आहे. मयताच्या भाऊ भूषण दुसाणे यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील व गणेश शेळके करीत आहेत.