भुसावळ- तालुक्यातील फुलगाव येथील आराध्य मेडीकलच्या गल्यातून अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. चेतन प्रमोद चौधरी (बद्री प्लॉट, जामनेर रोड, भुसावळ) यांचे मेडीकल फुलगाव येथे आराध्य मेडीकल दुकान असून 15 रोजीच्या मध्यरात्री ग्रीलच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातून 20 हजारांची रोकड लांबवली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.