फुलगाव शिवारातील विहिरीत अनोळखीचा मृतदेह आढळला

0

वरणगाव- हिरा मारोती मंदिराजवळील महामार्गाला लागून असलेल्या विहिरीत अनोळखी युवकाचा मंगळवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शेतमालक मोहन शांताराम यांच्या विहिरीत कोणीतरी अज्ञात व्यक्ती बुडून पावल्याची माहिती कळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी धाव घेतली. मोहन पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील, तडवी करीत आहेत.