होळनांथे । शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत तपासणी, औषधी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्याहस्ते सिद्धेश्वर हास्पीटलतर्फे संपन्न झाले. यावेळी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे.तसेच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठीही मार्गदर्शन केले. यावेळी 216 रुग्णांनी मोफत तपासणी करून मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. 16 रुग्णांवर डॉ.जितेंद्र ठाकूर हे धुळे येथे मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. या शिबीरासाठी गावातील किशोर राजपूत, साखरलाल राजपूत, सुधाकर पाटील, नवनाथ राजपूत, मिलींद बागूल, नामदेव कोळी, डॉ.निलेश पाटील, डॉ.संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
डोळे तपासणी शिबीर
शिरपूर । आर.सी.पटेल मेडीकल फाऊंडेशनतर्फे आयोजित, भुपेशभाई पटेल फ्रेंड्स सर्कल आणी विकास योजना आपल्या दारी अभियान यांच्या संयुक्त विद्यामानाने तालुक्यातील वकवाड आदिवासी भागातील ग्रामपंचायतीत 23 रोजी मोफत मोतिबिंदु निवारण व डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला दोंडाईचा येथील रोटरी आय हास्पिटलचे तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व सेवा लाभली. त्याप्रसंगी उपस्थित रुग्ण व बांधवांना उमरदा येथील शिरपुर साखर कारखान्याचे संचालक जयवंत पाडवी यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच प्रमुख मान्यवर म्हणुन सरपंचा निर्मला भिल, उपसरपंच ओंकार पावरा, पंचायत समिती माजी सभापती जगन पावरा, ग्रा.पं. सदस्य सुकलाल महाराज, विकासोचे चेअरमन शाम पावरा तसेच विकास योजना आपल्या दारी अभियानाचे कार्यकर्ते भैरव राजपुत, महेश पाठक, नईम ईनामदार, संदीप शिरसाठ व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक युवकांचे विशेष सहकार्य लाभले होते.