जळगाव । शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटला बुधवारपर्यंत स्वच्छ करण्याचे आदेश उपविभागीय जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी गाळेधारकांना दिले होते. बुधवारी मुदत संपल्याने गुरूवारी जलज शर्मा यांनी डिवायएसपी सचिन सांगळे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांच्यासह मार्केटची पहाणी केली. मार्केेटमधील गाळेधारकांना संपूर्ण मार्केट स्वच्छ करण्यासाठी 24 तासांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
या पहाणीत शर्मा यांना महिलांच्या स्वच्छतागृहात दुकान लावले आढळून आले. शर्मा यांनी यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्याकडे फुले मार्केटला किती गेट आहेत याची विचारणा केली. दरम्यान, पुढील स्वच्छतेची तपासणी गांधी मार्केटमध्ये करण्यात येईल अशी माहिती पत्रकारांशी बोलतांनी शर्मा यांनी दिली.