Minor Girl Abducted From Borkheda : Crime Against Youth मुक्ताईनगर : तालुक्यातील बोरखेडा जुने गावातील अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी संशयीत महेश किसन पवार या तरुणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून 6 रोजी संशयीत आरोपीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.