फॅमिली ट्रिपचा बहाणा; २५ हजारांची फसवणूक

0

निगडी : फॅमिली ट्रिपचे सवलतीच्या दरात पॅकेज देण्याचे आमिष दाखवून युवकाची 25 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी ते जून 2018 दरम्यान ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र कोणतीही सहल आयोजित केली नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत. अभिजित कुलकर्णी (वय 36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दोन व्यक्तींनी अभिजित यांना फॅमिली ट्रिपचे पॅकेज सवलतीच्या दरात देतो, असे सांगितले. त्या दोघांनी अभिजित यांच्याशी मोबाईल फोन आणि ई-मेल द्वारे वारंवार संपर्क केला. त्यानुसार अभिजित यांनी अज्ञात दोघांना 92 हजार रुपये दिले. पैसे घेऊन बरेच दिवस झाले, मात्र कुठलीही सहल आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे अभिजित यांनी त्या दोघांना पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत. वारंवार पैसे मागितल्यानंतर अभिजित यांना 67 हजार रुपये परत मिळाले. वरील 25 हजार न देता अभिजित यांची फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत.