फॅशन शो स्पर्धेत अनुष्का हराके, वेदांत गवळी प्रथम

0

चिंबळी : मोशी (ता. हवेली) येथील गुरुकुल डान्स क्लासेसच्या वतीने कुल टिन, मिस आणि मिसेस फॅशन शो 2017 आयोजित करण्यात आला होता. यावेळी रॅम्पवर थिरकणारी चिमुकली पाऊले उपस्थितांचे मन जिंकत होती. या फॅशन शो स्पर्धेमध्ये 5 ते 10 वर्ष वयोगटात मुलींमध्ये अनुष्का हराके तर मुलांमध्ये वेदांत गवळी यांनी प्रथम बक्षीस मिळविले. तसेच 11 ते 20 वर्ष वयोगटात कोमल लांडगे, स्त्रियांमध्ये अनघा पाटील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या.

उपविजेत्यांचाही सन्मान
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मडेगिरी, परीक्षक म्हणून प्लॅनेट मिसेस इंडिया पायल प्रामाणिक, तुषार रामनन, संस्थेच्या संचालिका स्विटी गोसावी, श्रीहान गोसावी उपस्थित होत्या. स्पर्धेत उपविजेत्या म्हणून किरण पवार, ओझल गजभारकर, रिया भागवत, स्नेहल क्षीरसागर, नीता गजभारकार, माही सोमवर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन विक्रम राव यांनी केले. तर शायनिंग चॅम्प, जस्ट फिट जिम, हिरकणी महिला प्रतिष्ठान, किडजी यांचे सहकार्य लाभले.