भुसावळ- तालुक्यातील फेकरीतील सायकल दुकानदार सतीश निळकंठ पाटील (वय 35) यांनी फेकरी शिवारातील एका शेतात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी चार वाजता ही घटना उघडकीस आली तर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. विष्णू भाऊ भिरूड यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन पाटील यांनी आत्महत्या केली. तालुक्याचे सहाय्यक फौजदार कमा काझी, सुपडा पाटील यांनी पंचमाना केला. फेकरी येथील पोलीस पाटील किशोर बोरोले यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार विजय पोहेकर तपास करीत आहे.