फेरपरिक्षेचा निकाल 24%

0

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी फेर परिक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 24.44 टक्के एवढा लागला असून पुणे विभागाचा निकाल 25.41 टक्के लागला आहे. या परिक्षेत 4 हजार 966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पुणे विभागाचा निकाल घसरला आहे.

मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण मंडळातर्फे 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांच्या फेर परिक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी पुणे विभागातून 19 हजार 546 विद्यार्थी बसले होते. यापैकी 4 हजार 966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात सर्वाधिक नागपूर विभागाचा निकाल लागला असून सर्वात कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तसेच पुणे विभागाचा 2015 मध्ये पुणे 26.15 टक्के व 2016 मध्ये 30.93 टक्के एवढा निकाल लागला होता. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत पुणे विभागाचा निकाल यंदा पाच टक्याने घसरला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. तर ज्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रती हव्या आहेत, त्यांनी 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. तसेच 11 वी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी मंडळाच्या ऑनाईन गुणपत्रिका स्वसाक्षांकीत करून ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेच्या कार्यकक्षेबाहेरील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाइन गुणपत्रिका स्वसाक्षांकीत करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावायचा आहे, अशा सूचना राज्यमंडळाचे सचीव कुष्णकुमार पाटील यांनी केल्या आहेत.