मुंबई हॉकर्स संघटनेनेचा निर्णय
पिंपरी : पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणेसह महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये टपरी-पथारी-हातगाडी धारकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई सुरू आहे. सरकार आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे उल्लंघन करून ही कारवाई होत आहे. त्यामुळे या कारवाई विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई हॉकर्स संघटनेने घेतल्याची माहिती कामगार नेते बाबा कांबळे यांनी दिली आहे. मुंबईतील महाराष्ट्र लेबर संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला शशांक राव, बाबा कांबळे, शंकर साळवी, शांताराम चव्हाण, शब्बीर विद्रोही, रवी राव, शिवाजी गोरे, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, राजू पोटे, दिलीप सुराडकर आदी उपस्थित होते.
राज्यव्यापी लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य फेरीवाला संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी शशांक राव, सरचिटणीसपदी बाबा कांबळे, कार्याध्यक्षपदी शांताराम चव्हाण, शब्बीर विद्रोही, रवी राव यांची निवड करण्यात आली. 9 व 10 मे रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मेळावा घेऊन या नंतर महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार आहेत.