फेसबुकवर राष्ट्रवादीच्या महिलांबद्दल अपशब्द

0

पिंपरी : फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांबाबत अनिकेत बापट या व्यक्तीने अनुद्गार काढले आहेत. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी पोलिसांकडे केली आहे.याबाबत जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सोशल मीडियावर अनिकेत बापट या नावाने फेसबुक अकाउंट आहे.

मंगळवारी (दि.6) रोजी या अकाउंटद्वारे या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिका-यांविषयी अपशब्द वापरले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व महिला नेत्या या दिसायला खूप छान असतात. पक्षाचा तसा नियम आहे का? निवड करणारे कोण आहेत? असे अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महिलांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून अशा वक्तव्याने संपूर्ण महिला जातीला लज्जा निर्माण होईल, अशा प्रकारचे वाईट कृत्य केले आहे.