फेसबुक डेटा लीक प्रकरण : अमेरिकेसमोर झुकेरबर्ग झुकले

0

वॉशिंग्टन । डेटा लीकप्रकरणी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकी काँग्रेसची माफी मागितली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, 8.70 कोटी वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षिततेची जबाबदारी आमची होती; परंतु आम्ही त्यात कमी पडलो. त्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत. त्यामुळे मला माफ करा, असे म्हटले आहे. तसेच अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून नियम अधिक कठोर केले जातील; जेणेकरून कोणतीही विदेशी शक्ती अमेरिकेतील निवडणुकांना प्रभावित करू शकणार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले.

ब्रिटिश कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकाशी वापरकर्त्यांचा डेटा शेअर केल्याप्रकरणी जगभरातून टीका होत असलेले मार्क झुकेरबर्ग हे मंगळवारी अमेरिकी काँग्रेसच्या सिनेट समितीसमोर हजर झाले. सुमारे 44 खासदारांनी त्यांना विविध प्रश्‍न विचारले. या वेळी सुमारे इतर 200 नागरिकही उपस्थित होते. अमेरिकी प्रतिनिधी मंडळाने झुकेरबर्ग यांचा माफीनामा जाहीर केला. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 12 वाजता झुकेरबर्ग यांची सुनावणी सुरू झाली.