पिंपरी-चिंचवड : फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून झालेल्या मित्राकडून एका डॉक्टर महिलेची तब्बल 42 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रतिभा शामकुवर (वय 55, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माईक रोडरिगुर असे या आरोपीचे नाव आहे.
गंडलेली महिला फुगेवाडीची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा यांची फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून माईक याच्याशी ओळख झाली होती. मैत्री झाल्यानंतर युनायटेड किंग्डम येथून महागडे गिफ्ट पार्सल पाठविल्याचे सांगून ते सोडविण्यासाठी प्रतिभा यांना वेळोवेळी दिल्ली व बिहार येथील बँकांमध्ये वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये 41 लाख 82 हजार रुपये भरावयास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या दरम्यान आरोपीने 7836023117 व आरबीआय येथून बोलणा-या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक 9990074666 वापरला. प्रतिभा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहे.