फैजपूर : कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघण केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी शनिवारी केल्याने व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली. सलग दुसर्या दिवशी कारवाई झाल्याने नियम पाळूनच व्यवसाय करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा सूचक संदेशही मुख्याधिकार्यांनी दिला आहे.
नियमांचे उल्लंघण झाल्याने कारवाई
शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शहरातील एक कापड दुकान व ब्रांडी हाऊसवर नियमांचे उल्लंघण केल्याने सील ठोकले होते त्यानंतर व्यवसायीक व नागरीक काहीतरी धडा घेतील, असे वाटत असतानाच बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉल मध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघण झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक भेट देतात मॉलला सील करण्याची कारवाई केली. याबाबत कारवाईला मुख्याधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.