मरिमातेच्या यात्रेला 120 वर्षांची परंपरा ; संजय कोल्हे ओढणार बारागाडया
फैजपूर- दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थान असून यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे मंगळवारी, 21 रोजी सायंकाळी पाच वाजता फैजपूरात बारागाड्या ओढल्या जाणार आहे. यात्रोत्सवाला 120 वर्षाची अखंड परंपरा आहे. फैजपूरसह परीसरातील भाविक भक्तगण दर्शनासाठी शहरात दाखल होतात. मरीमातेचे देवस्थान जागृत असून पुरातनकाळी गावात कॉलराची साथ आली असताना मरीमतेच्या देवस्थानात नागरीकांनी गावावर आलेले संकट टळू दे, बारागाड्या ओढू अशी प्रार्थना केल्यानंतर संकट टळले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हापासून दरवर्षी श्रावण महिन्यात बारागाड्या ओढल्या जाता. दरवर्षी कै.विठ्ठल महारू कोळी हे बारागाड्या ओढत असत मात्र गतर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी त्यांचे सहकारी संजय कोल्हे बारागाड्या ओढणार आहेत. कोल्हे यांना बगले राजू मेढे व नरेंद्र चौधरी असणार आहे. यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.