फैजपूर । दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरिमातेचे जागृत देवस्थान असून यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे मंगळवारी 21 रोजी सायंकाळी 6 वाजता संजय सेवकराम यांनी मंगळवारी फैजपूरात बारागाड्या ओडल्या. संध्याकाळी 4 वाजता देवी वाडयातील नेमाडे यांच्या घरी विधिवत पूजा करून भगत यांची गावातून मिरवणूक काढून बारागाड्या ठिकाणी आणण्यात आले त्यानंतर बरगाड्यांना पाच फेर्या मारून भगत संजय कोल्हे यांनी म्युनिसिपल हायस्कुल ते सुभाष चौक पर्यंत बारागाड्या ओढल्या या मारिमातेचे यात्रोत्सवाला 120 वर्षाची अखंड परंपरा चालत आली आहे. फैजपुरसह परिसरातील भाविक भक्तगणाची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. दरवर्षी श्रावण महिन्यात शुल्क दकादशी मंगळवारी या दिवशी बारागाड्या ओढल्या जाता. दरवर्षी कै.विठ्ठल महारू कोळी हे बारागाड्या ओढत असत मात्र गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी त्यांचे सहकारी संजय सेवकराम कोल्हे यांच्या हस्ते ओढले गेले कोल्हे यांचे सहकारी राजू मेढे व नरेंद्र चौधरी होते. यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवला होता.