फैजपूरकरांची चिंता वाढली : पुन्हा आठ कोरोनाबाधीत आढळले

0

फैजपूर : प्रशासनाला प्राप्त झालेल्या आवाहलात आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने शहरवासीयांची पुन्हा चिंता वाढली आहे. त्यात एका पोलिसासह एका आठ वर्षीय लहान बालिकेचा समावेश आहे. फैजपूर येथील कोरोनाबाधीतांची संख्या ही 19 वर गेली आहे तर यातील चार जण हे उपचार घेऊन घरी परतले आहे त्यामुळे सद्यस्थितीत 15 बाधीतांवर उपचार सुरू आहेत. प्रथमच आठने रुग्ण संख्या वाढली असून ही वाढती रुग्ण संख्या शहर व प्रशासन चिंतेचा विषय बनला आहे. आठ रुग्णांमध्ये चार रुग्ण हे पूर्वीच्या बाधीतांच्या संपर्कातील असून चार हे नवीन भागातील आहेत. फैजपूर शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या ही 9 झाली आहे . शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.