फैजपूरच्या इसमाचा रीक्षात हृदयविकाराने मृत्यू

यावल : फैजपूर येथील रीक्षा स्टॉपवर लावलेल्या रीक्षात एका 54 वर्षीय इसमास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीकस आली. चंद्रकांत तुकाराम वाघुळदे (54,मिरची ग्राउंड रोड भाग, फैजपूर) असे मयताचे नाव आहे. फैजपूर शहरातील रीक्षा स्टॉपवर लावण्यात आलेल्या रीक्षात गुरूवारी सकाळी एकाचा इसमाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना माहिती कळवल्यानंतर मयत फैजपूर शहरातील मिरची ग्राउंड रोड भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. चंद्रकांत तुकाराम वाघुळदे असे त्यांचे नाव असून ते रात्री उशिरा घरी आले नव्हते व ते रात्री रीक्षात झोपले असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत फैजपूर पोलिसात वंदना चंद्रकांत वाघुळदे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परीरवार आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र काटे, उमेश चौधरी करीत आहे.