फैजपूरच्या जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमध्ये 3 जुलै रोजी ‘समुपदेशन 2018’

0

फैजपूर- जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमध्ये मंगळवार, 3 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे ‘समुपदेशन 2018’ हा कार्यक्रम होणारर आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबईवरून सकाळी 10 ते दुपारी दोन या वेळेत करण्यात येणार असून त्याची व्यवस्था ही तंत्रनिकेतनमधील सेमिनार हॉलमध्ये करण्यात आली आहे. परीसरातील सर्व दहावी, बारावी (विज्ञान), आय.टी.आय.उत्तीर्ण तसेच डिप्लोमा प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्राचार्य पी.बी.पाटील यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

समुपदेशन कक्षाची स्थापना
कार्यक्रमात राज्यातील विविध प्रख्यात तज्ञ मंडळींमार्फत थेट प्रक्षेपणाद्वारे दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील विविध संधी विषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पालक, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रयोजन म्हणजे यातील तज्ञांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम दिशा निवडून त्यात यशस्वी होणे हे आहे. या आधीच जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना त्याद्वारे प्रवेशप्रक्रिया, विविध अभ्यासक्रम, ऑप्शन फॉर्म्स ईत्यादीबाबत सविस्तर माहिती पुरविण्यात येत आहे. संस्थेत डी. टी. ई. मान्यताप्राप्त फॅसिलीटेशन सेंटर उपलब्ध आहे. त्यात विनामूल्य अर्ज आणि ऑप्शन फॉर्म्स भरण्याची सुविधा देण्यात येत आहे.