फैजपूरातील 300 भाविक कुंभमेळ्यासाठी रवाना

0

फैजपूर- प्रयागराज येत होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी शहरातील सुमारे 300 भाविक भुसावळ येथील रेल्वे स्थानकावरून नुकतेच रवाना झाले. भाजपा पालिका गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, रवींद्र होले, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, राजू भारंबे, राजेंद्र किरंगे, नितीन किरंगे, चंदू वाढे, रमेश सराफ, नितीन बोरोले, संजय सराफ, किरण वाघुळदे, ललित कोल्हे, चंदू भोगे, प्रदीप चौधरी, सतीश जंगले, ललित खडके, मेघराज नेमाडे, वासू सरोदे, योगेश सोनवणे, अविनाश चौधरी, राजू भोई, संदीप होले, निलेश पाटील यासह शहरातून असंख्य भाविक रवाना झाले आहे.

महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांचे गोपी गीत
फैजपूर येथील तथा महाराष्ट्रातून एकमेव संथ महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रयागराज येथील कुंभमेळा येथे 10 ते 19 जानेवारी येथे गोपीगीत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.