फैजपूरातून अपहरण केलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : आरोपीला अटक

फैजपूर : शहरात खंडोबाची यात्रोत्सव पाहण्यासाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस 20 मार्च रोजी दोघांनी दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका संशयीताला अटक केली असून अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे तर अटक करण्यात आलेल्या जीवन अशोक भालेराव (भालोद, ता.यावल) यास न्यायालयात हजर केले असता त्यास 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

फैजपूर पोलिसात दाखल होता गुन्हा
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह 20 मार्च फैजपूर येथे खंडोबा यात्रा पाहण्यासाठी आली होती. दुपारी अल्पवयीन मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघेजण यात्रा पाहुन घरी जात होते. त्याचवेळी संशयीत जीवन अशोक भालेराव (भालोद) व आकाश संजय भागवार (सावदा) हे दुचाकीवर आले व दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का दिला व मुलीला त्यांच्या ताब्यातून पहवून नेले होते. मुलीच्या भावाला आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी पीडीत मुलगी व संशयीत आरोपी जीवन भालेराव यास ताब्यात घेतले तर पीडीतेवर अत्याचार करण्यात आल्याची बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले. भुसावळ अतिरीक्त न्यायालयात संशयीत जीवन भालेराव यास हजर केले असता सोमवार, 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.